Pune Crime : उरुळी कांचनात कौटुंबिक वाद: सासऱ्याने जावयाच्या पायाला फ्रॅक्चर होईपर्यंत दांडक्याने मारहाण

पुणे -प्रतिनिधी

घरगुती भांडणाच्या रागातून सासऱ्याने जावयाला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून पायाचा नडगा फोडला. उरुळी कांचन ढगेमळा भागात गुरुवारी (१२ फेब्रुवारी) रात्री १० वाजता ही घटना घडली असून, पत्नी व सासऱ्याच्या मित्रावरही गुन्हा (Crime) दाखल झाला.फिर्यादी किरण रखमाजी कांचन (३५) यांच्या घरी पत्नी गौरी कांचन, सासरे अशोक तिकोने व त्यांचा मित्र राजू शिनगारे हे शिवीगाळ करत आले. (Pune Crime)

त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली (Pune Crime) आणि सासऱ्याने खोऱ्याच्या दांडक्याने किरणच्या उजव्या पायाच्या नडग्यावर वार केला.मारहाणीनंतर आरोपी निघून गेले. जखमी किरण यांनी आईला फोन केला आणि रुग्णवाहिकेने उरुळी कांचन (Uruli kanchan) खासगी रुग्णालयात दाखल केले.

एक्स-रेत पायाला फ्रॅक्चर आल्याचे निदान झाले.उरुळी कांचन (Uruli kanchan) पोलीसांनी भाजीपाला संहिता ११५(२), ११८(१), ३५२ अंतर्गत तिघांवर गुन्हा नोंदवला. तपास हवालदार सलीम शेख (Police Constable Salim SHaikh) करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *