पुणे -प्रतिनिधी
पदभार स्वीकारताच महापौर मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure )यांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेची अचानक पाहणी केली. अनेक संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या तैनातीचा अभाव आढळल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. आयुक्त डॉ. नवलकिशोर राम (Nvalkishor Ram) यांना तात्काळ आढावा बैठक बोलावण्याचे निर्देश दिले.महापौर नागपुरे यांच्या अनपेक्षित दौऱ्यादरम्यान मुख्य प्रवेशद्वारांवर, कॉरिडॉरवर आणि महत्त्वाच्या खोल्यांबाहेर सुरक्षा कर्मचारी गैरहजर असल्याचे उघड झाले.
“कोणालाही सहज आत येऊ देण्याचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला. पुणेकरांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होणार नाही, असेही स्पष्ट केले.भाजपच्या ( Bjp ) निष्ठावंत नेतृत्वाची कडक भूमिकासलग तिसऱ्यांदा प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी-माणिकबाग) मधून बिनविरोध नगरसेविका (Nagarsevika)म्हणून निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure) या भाजपच्या अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत.
स्थायी समितीवर काम केलेल्या नागपुरे यांनी महापौरपद स्वीकारताच प्रशासनाला ‘झटका’ दिला. या कारवाईने महापालिकेतील (Pune Mahanagarpalika )शिस्तीची नवी सुरुवात झाली असल्याचे मानले जात आहे.
