कोथरूडमधील खुनी हल्ला व खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) व सचिन घायवळ (Sachin Ghaywal) बंधूंना गेल्या तीन महिन्यांपासून पकडता न आल्याने पुणे पोलिसांच्या तपासयंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नीलेश घायवळ लंडनला पसार असून त्याचा पासपोर्ट व व्हिसा रद्द झाल्याने तो देशात दाखल होण्याची शक्यता असतानाही त्याचा माग लागला नाही, तर सचिन घायवळ महाराष्ट्रात असतानाही गुंगारा देत आहे.
कोथरूडमध्ये (Kothrud) १७ सप्टेंबर २०२५ रोजी किरकोळ भांडणातून पिस्तूल व चॉपरने दोन तरुणांवर हल्ला करून नीलेश घायवळ विदेशात फरार झाला. त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) हा जामखेड ( Jamkhed ) परिसरात दिसला असतानाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने पसार झाला. नीलेश घायवळ प्रत्यार्पणासाठी रेड कॉर्नर नोटीस व ब्रिटिश उच्चायोगाशी पत्रव्यवहार झालेला असून, विमानतळांवर सापळे रचले तरी तो हेराफेरी करत आहे.
सचिन घायवळवर (Sachin Ghaywal) चाळीस लाख खंडणी व दहा फ्लॅट बळकावण्याचे आरोप असून, इतर सहा आरोपींवर मोकोका (Maccoca) लावण्यात आला. घायवळ बंधूंना राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा पोलिस वर्तुळात सुरू असून, तांत्रिक तपास व आंतरराष्ट्रीय प्रयत्न असूनही यश न मिळाल्याने राजकीय इच्छाशक्तीवर शंका घेतली जात आहे.(Pune Crime)
