Bhor : महाशिवरात्रच्या यात्रेत बनेश्वरला दोन गटांत तुफान हाणामारी

पुणे -प्रतिनिधी

महाशिवरात्रच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र बनेश्वर (Baneshwar Temple ) येथे प्रचंड गर्दी असताना दोन गटांतील वादाने हिंसक रूप धारण केले. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून, राजगड पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.घटनेचे निमित्त १५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता बनेश्वर मंदिराजवळील मनोरंजन स्टॉल परिसरात घडले. विजय बापुराव सपकाळ हे लहान मुलांसाठी स्टॉल चालवत असताना फंडाच्या पैशांवरून जुना राग काढण्यासाठी काहींनी वाद सुरू केला, असा आरोप त्यांनी केला आहे. (PUne Gramin)

तक्रारीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमावून सपकाळ यांना हाताने व काठीने मारहाण केली, (Pune Crime )शिवीगाळ व धमक्या दिल्या. भांडण मिटवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनाही निशाना बनवला गेला, तर सपकाळ यांच्या आजीच्या हातातील काठी हिसकावून त्यांच्या पाठी व कंबरेवर हल्ला केला. यात फिर्यादी व आजी जखमी झाली, तसेच स्टॉलची तोडफोड करून नुकसान केले गेले.

दुसरीकडे, अनिकेत चंद्रकांत जाधव (Aniket Jadhav)यांच्या तक्रारीत मात्र उलट सांगितले आहे की, ते फंडाच्या पैशांबाबत विचारणा करण्यासाठी मंदिर कमानीजवळील जानकीराम मंगल कार्यालयात गेले असता दुसऱ्या गटाने वाद घातला. त्यांना लाकडी बांबूने डोक्यावर व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुचाकीची तोडफोड केली, शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad POlice Station) दोन्ही फिर्यादांवर स्वतंत्र गुन्हे नोंदवले गेले. यात्रेच्या गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.पोलीस हवालदाराकडून प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व संशयितांची चौकशी, साक्षीदारांचे जबाब व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *