Bhigwan : भिगवणमधील तो ड्रामा ! मुलीचा व्हिडिओ खरा का बनावट ? पडळकर-जगताप आक्रमक!

पुणे -प्रतिनिधी

 

पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील भिगवण येथे लग्नठरलेल्या तरुणीचे कथित अपहरण झाल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर  (Gopichand Padalkar )आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढत पोलीस ठाण्यापर्यंत निदर्शन केले.
भिगवण (Bhigwan) बसस्थानकापासून निघालेल्या या मोर्च्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.प्रकरणाला नाट्यमय वळण लागले तेव्हा सोशल मीडियावर तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला. यात ती ‘जहीर शेख याच्यासोबत मी स्वखुशीने पळून आली आहे आणि माझ्यावर कोणताही दबाव नाही,’ असे सांगत दिसते. मात्र आमदार पडळकर (Aamdar Padalkar) यांनी हा व्हिडिओ जबरदस्तीने बनवून पोलिस व कुटुंबीयांना पाठवल्याचा आरोप केला. मुलीचे वडील हयात नसून तिचे लग्न काही दिवसांत होणार होते,
अशी माहिती देत त्यांनी आरोपींच्या कुटुंबावर पूर्वी गुन्हे  (Crime )दाखल असल्याचा आणि स्थानिक दहशत निर्माण केल्याचा दावा केला. पोलिसांनी कठोर कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही आक्रमक भूमिका घेत कोणत्याही व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. मुलगी प्रत्यक्ष हजर न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. हे प्रकरण आंतरधर्मीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक तणाव आणि राजकीय भूमिकांशी जोडले गेले असून, अफवांपेक्षा सत्य स्पष्ट करून शांतता राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सध्या सर्वांच्या नजरा मुलीच्या हजेरीवर आणि पोलिस कारवाईवर केंद्रित झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *