पुणे -प्रतिनिधी
दोन वर्षांच्या चिमुकल्यासमोर वडिलांनी घराची कडी आतून बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना माळी मळा परिसरातील महात्मा फुले नगरात शुक्रवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.धर्मराज तीरीन चंद्राकार (अंदाजे ३५, मूळ छत्तीसगड) हे कुटुंबासह लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे राहत होते. माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पत्नी किराणा आणण्यासाठी बाहेर पडल्या. घरात धर्मराज व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा उरला.
याचवेळी धर्मराज यांनी घराची कडी आतून लावली. परत आलेली पत्नीने दरवाजा ठोठावला, हाक मारली पण कोणताही प्रतिसाद नाही. (Pune Crime News )संशयाने शेजाऱ्यांना बोलावले आणि लोणी काळभोर पोलीसांना कळवले.लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पीआय अंकुश बोराटे, बीट मार्शल अंकुश घुले, निखील मेमाणे, रुपाली कदम, निकिता पोळ व इतर जिघाडावरील नागरिकांच्या मदतीने दरवाजा फोडण्यात आला.(Crime News)
तेव्हा मोरीजवळ छताच्या अँगलला गमछ्याने गळफास (Sucide) घेऊन लटकलेल्या अवस्थेत धर्मराज आढळले. त्यांना तात्काळ उतरवून विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत घोषित केले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवला. अहवालानंतर मृत्यूकारण स्पष्ट होईल. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गूढ असून पोलिस तपास करीत आहेत. या घटनेची सर्वात वेदनादायी बाब म्हणजे दोन वर्षांचा चिमुकला घरात होता. आई दरवाजा फोडत असताना तो आतून बोलत होता पण कडी उघडू शकला नाही. वडिलांना वाचवू न शकल्यानं त्याचा निष्पाप चेहरा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
