Lonikand Crime : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर मेसेज का केलास म्हणत मध्यरात्री लोणीकंद मध्ये कुटुंबावर हल्ला; : घर-दुचाकीची तोडफोड … गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील  (Whatsap Group )किरकोळ वादाने मध्यरात्रीला शिंदेवस्तीतील एका कुटुंबावर चार जणांनी प्राण्यांप्रमाणे हल्ला चढवला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील पूर्व वाडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत बुधवार (ता. १८) रात्री साडेबारा वाजता घडलेल्या या घटनेत घराच्या काचा फोडल्या, दुचाकी उद्ध्वस्त केली तसेच तिघांना लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केली. परिसरात दहशत पसरली असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे(Crime News).

वैभव नंदेश शिंदे (२९, शेती) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवार रात्री आठ वाजता राजेंद्र शिंदे याने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर उत्तेजित मेसेज टाकला, ‘राजू शिंदेंच्या वस्तीत कोणी येऊ नका, पैसे मागणाऱ्यांना बांबूचे फटके पडतील.’ वैभव यांनी उत्तरात ‘विचार करण्याची वेळ आली आहे’ असे लिहिले. त्यावर अकरा वाजता राजू शिंदेने स्वतःला ‘वस्तीचा बाप’ म्हणून धमकावले, ‘मारून टाकीन, कापून टाकीन.’ वैभव काही बोलले नाहीत आणि घरी परतले.

साडेबारा वाजता राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) घरासमोर दाखल झाला आणि दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या, दरवाजा व दाजी महेश जगताप यांच्या दुचाकीवर लोखंडी रॉडने वार केले. भांडणाचा आवाज ऐकून रोहीत शिंदे, आई शकुंतला व बहिण शिल्पा धावले तेव्हा राजेंद्र व त्याचा मेहुणा यांनी रोहीतला डोक्यात, पाठीत, हातावर रॉडने मारले. आदेश तुषार शिंदे व सार्थक राजेंद्र शिंदे यांनी बांबूने पाठीवर थेट हल्ला केला. शिल्पा व शकुंतला यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

आरोपींमध्ये राजेंद्र गेनुभाऊ शिंदे, सार्थक राजेंद्र शिंदे, आदेश तुषार शिंदे व राजेंद्रचा मेहुणा यांचा समावेश असून ते शिंदेवस्तीतच राहतात. वैभव कुटुंब शेती करून उदरनिर्वाह चालवते. पोलिस तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *