Maharashtra Police :पोलीसांनो सावधान ! 51 हजार पोलिसांसाठी नवीन कायद्यांचे बंधनकारक प्रशिक्षण वाचा नियम

पुणे – प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस दलातील शिस्त व गांभीर्य टिकवण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, गणवेशात रील्स, मिनी-व्लॉग किंवा इतर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा नियम मुंबईतील ५१ हजार पोलिस कर्मचाऱ्यांना लागू असून, उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल .
विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे (SB DCP Dattatry Kamble ) यांनी गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अनेक कर्मचारी कर्तव्यावरील संवेदनशील ठिकाणे, सरकारी वाहने व शस्त्रांचे चित्रीकरण करतात, ज्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो. विधीमंडळातही आमदारांनी तक्रारी उपस्थित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, ‘खाकी स्वॅग’ ट्रेंडवर पूर्ण चाप बसणार आहे .(Maharsashra Police )
या नियमाची अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबला सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. वैयक्तिक व अधिकृत खाती वेगळी ठेवावीत, गोपनीय माहिती टाळावी आणि खासगी आयुष्य व कर्तव्याची सरमिसळ होणार नाही, (Khaki)याचे स्पष्ट आदेश आहेत. यामुळे पोलीस दलाची (Pune Police ) प्रतिष्ठा जपली जाईल, अशी अपेक्षा आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *