Pune Crime : पुणे रेल्वे स्टेशनवर ४ वर्षीय मुलीवर अत्याचार ; त्या नराधमाचा फोटो समोर

पुणे – प्रतिनिधी

पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर १७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मध्य प्रदेशहून ऊसतोडणीचे काम संपवून गावी परतत असलेल्या कुटुंबाच्या ४ वर्षीय मुलीवर चॉकलेट व बिस्किटाच्या आमिषाने फसवून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. आई-वडील व चार लहान मुलांसह प्लॅटफॉर्मवर झोपले असताना आरोपीने शेजारी बसून मुलीला स्टेशन आवारात नेले व तिथे हा घृणित प्रकार घडवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीसाठी वाट पाहत असताना मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी GRP व RPF ला तक्रार दिली, ज्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली.(Pune Crime)
वैद्यकीय तपासणीनंतर मुलीच्या आईच्या फिर्यादीवर भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६५(२) व पोस्को (Pocso) कायद्याचे कलम ४,९,१० अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, मध्य प्रदेशचे असलेले आरोपी कोर्टात हजर करण्यात आले . या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवरील महिला व बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पुढील तपास सुरू आहे .(Crime News )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *