पुणे – प्रतिनिधी
लक्ष्मी चौक(Laxmi Chawk) परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता दारूच्या नशेत धुंद असलेल्या महेंद्र सोपान कांबळेने (३५) आपल्या पत्नीवर धारदार भाजी कापण्याच्या चाकूने जीवघेणा हल्ला केला. पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करत असताना मध्यस्थी करायला गेलेल्या पत्नीला “तुला आज खल्लास करतो” म्हणत पोटात चाकू भोसकला.(Pune Crime)
रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून, स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी (Hinjwadi Police ) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी पतीला बेड्या (Arrest ) ठोकल्या. प्राथमिक तपासात नशेच्या भरात झालेल्या या हल्ल्याचा तपशील समोर आला असून, पोलिस घटनेचा पुढील छडा घेत आहेत. या संतापजनक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.(Crime News)
