पुणे -प्रतिनिधी
नसरापूर-राजगड मार्गावरील कुरुंगवडी येथे शनिवारी सकाळी अकरा वाजता धान्य मळताना ४१ वर्षीय शुभांगी नीलेश राऊत यांचा स्कार्फ आणि केस मशीनमध्ये अडकून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.(Pune Crime)
शेतात मसूर-वाटाणा मळण्याच्या कामात वाकल्या असताना मशीनने त्यांना खेचले आणि मोठ्या रक्तस्रावाने नसरापूर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन वाढदिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्याप्त झाली असून राजगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.(Death)
दुसरीकडे पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर शुक्रवारी सकाळी पावणेनऊ वाजता भरधाव डंपरने दुचाकीला धडक देऊन ३८ वर्षीय परिमा हेमंत प्रधान (Parima Pradhan)यांचा जागीच मृत्यू झाला. टिळेकरनगरहून निघालेल्या परिमा कात्रज डेअरी चौकात धडकेत गंभीर जखमी झाल्या आणि रुग्णालयात दाखल करताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. नातेवाईक अभिषेक निगडे (Abhishek Nigade) यांच्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी डंपरचालक संजय प्रभाकर जाधव (Sanjay Jadhav) (२८, रा. उरळी देवाची) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सहायक निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.( Pune )
