पुणे = प्रतिनिधी
पुण्यातील खराडी (Kharadi )परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड बुलेट सायलन्सरवर पोलिसांनी कठोर कारवाई केली.(Crime) रहिवाशांच्या सततच्या तक्रारींनंतर खराडी पोलीस स्टेशनने पेट्रोलिंगदरम्यान सापळा रचून ४५ बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (PI Sanjay Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने मॉडिफाईड सायलन्सर काढून टाकले आणि कंपनीचे मूळ सायलन्सर बसवले. दंड आकारला असून, जप्त सायलन्सर बुलडोझरखाली नष्ट करण्यात आला. या कारवाईने बुलेटस्वारांमध्ये धाक बसला असून, पोलिसांनी भविष्यात अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.(Kharadi Police Station)
