पुणे -प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील आशियाना परिसरात हृदयद्रावक घटना घडली.(Uttarpradesh Crime) वर्धमान पॅथोलॉजीचे संचालक मानवेंद्र सिंह यांचा मृतदेह स्वतःच्या घरातील निळ्या ड्रममध्ये सापडला. २० फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या मानवेंद्र यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली होती, मात्र तपासात त्यांचा २१ वर्षीय मुलगा अक्षत हाच आरोपी असल्याचे उघड झाले.(Crime)
समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षण आणि करिअरच्या मुद्द्यावर वडिलांशी वाद झाल्यानंतर अक्षतने परवानाधारक रायफलने गोळी झाडली. जागीच मृत्यू (Death) झाल्यावर त्याने मृतदेहाचे तुकडे करून तिसऱ्या मजल्यावरून खालच्या खोलीत आणला आणि ड्रममध्ये भरला. काही अवयव इतरत्र टाकले असल्याचेही तपासात समोर आले. घटनेच्या वेळी घरात १६ वर्षीय बहिण होती, पण आरोपीने तिला धमकावले.पोलिसांनी अक्षतला ताब्यात घेतले असून, फॉरेंसिक तपास सुरू आहे.(Crime news)
या सनसनीखेज प्रकरणाने आशियाना परिसरात भीती पसरली असून, कुटुंबातील नातेसंबंधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
