Pune Crime : ओरडलात किंवा हालचाल केली तर कापून टाकू ! जुन्नर मध्ये मध्यरात्री दरोडेखोरांचा तीन तासांच्या कहराने कुटुंब थरथरले .. चोरटे सोन्या चांदीचे दागिने घेऊन फरार

पुणे -प्रतिनिधी

जुन्नर (JUnnar) तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास शेतातील राजेंद्र कोरडे (Rajendra Korade)यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चढवला. शस्त्र धाक दाखवून कुटुंबाला तीन तास बंधनात ठेवून १५ तोळे सोन्याचे दागिने, १० तोळे चांदीची भांडी आणि ५० हजार रोख रक्कम लंपास केली.गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला घराचा मुख्य दरवाजा तोडून जागे करत चार दरोडेखोरांनी राजेंद्र कोरडे (५२) यांच्यावर काठीने वार केले.(Crime News)

पत्नी आणि दोन मुलींच्या मानगूटांवर कोयते ठेवून “ओरडलात किंवा हालचाल केली तर कापून टाकू” अशी धमकी देत सर्वांना एका खोलीत बांधले. दागिन्यांची पेट्या फोडून लूटले आणि पलंगाखालील रोख माल लंपास करून सकाळी साडेचार वाजता मोटारसायकलवर पळून गेले.सकाळी सुटका झाल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना कळवले. आळेफाटा पोलिसांनी (Aalephata Police ) गुन्हा दाखल करून शेतात पायांच्या ठसे, मोटारसायकलचे चाकांचे निशाण तपासले. दरोडेखोरांचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज (CCTV )आणि नऱ्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपास सुरू केला आहे. कोरडे कुटुंबावर शोककळा पसरली असून ग्रामीण भागात दरोड्यांचा उद्रेक रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *