पुणे -प्रतिनिधी
विमाननगरमधील एका इमारतीत स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव (Pi govind Jadhav) यांच्या पथकाने तिथे छापा टाकला. मात्र, पोलिसांना पाहताच घाबरलेल्या एका तरुणीने आणि तिथे असलेल्या व्यवस्थापकाने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली होती. दरम्यान, तरुणीचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला होता.(pune Crime)
या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांची भेट घेऊन “या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल केला. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करावी असे सांगितले आहे. आयुक्तांनी हा तपास सीआयडीने करावा असे आदेश दिले आहेत.
मृत तरुणीच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “छापा टाकला तेव्हा नक्की काय घडले? तरुणीला उडी मारण्यास भाग पाडले गेले ?” दरम्यान, सीआयडी सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.(Death body)
