Pune Crime : लोखंडी रॉड व दांडक्याने शिंदवणेतील हॉटेल व्यावसायिकावर हल्ला; तिघांना गुन्हा

पुणे – प्रतिनिधी

आमच्या पोरांना फुकट जेवण द्यायचं नसेल तर या हद्दीत धंदा करू नकोस,” (Pune Crime)अशी दमदाटी करत शिंदवणे (ता. हवेली) येथील हॉटेल चालक योगेश बाजीराव मांढरे (४०) (Crime News) यांच्यावर गुरुवारी (१२ मार्च) दुपारी चार वाजता तिघांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.(Uruli Kanchan)

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून,(Assault Case) पीडिताच्या करंगळीचं हाड गहाण गेलं.घटना शिंदवणेंतर्गत उरुळी कांचन भागात घडली. आरोपी श्रवण संतोष शिंदे, श्रेयस संदीप शिंदे आणि संग्राम शंकर शिंदे (सर्व रा. शिंदवणे) हे तिघे हॉटेलवर आले.(Police Action)

त्यांनी मांढरे यांना बाहेर बोलावून फुकट जेवणाची मागणी करत वाद सुरू केला. (Crime Update)वाद तीव्र झाला आणि त्यांनी लोखंडी रॉडने डोक्याच्या मागे, कानावर, पोटावर, कंबरेवर तसेच दांडक्याने तोंडावर व डाव्या हातावर मारहाण केली.मांढरे हे शेती व हॉटेल व्यवसायात आहेत. फिर्यादीनुसार, मारहाणीत करंगळीचं हाड ब्रेक झालं. उरुळी कांचन पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११७(२), ११८(१), ३५१(२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.(Law And Order)

पीआय सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI अनिल खोमणे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *