पुणे – प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदू (Nashik Crime) भविष्यकार अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चाकणकर-खरात यांचे कौटुंबिक आणि आर्थिक संबंध असल्याचा दावा करत, चाकणकरांनाही तंत्रमंत्र करणाऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले.
या प्रकरणात सत्य उघड करण्यासाठी चाकणकरांची नार्को टेस्ट आणि तात्काळ अटक करण्याची मागणी अंधारे (Sushma Andhare)यांनी केली.चाकणकरांच्या अनामिकेवरील जखमेचा फोटो दाखवत अंधारे म्हणाल्या, “सोमवती अमावस्या असलेल्या २ सप्टेंबरला चाकणकरांनी तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली. पीडित महिलांनी हे सांगितले असून, चाकणकर पीडितांवर दबाव टाकत होत्या.” पत्रकाराला आयोगाच्या लेटरहेडवर नोटीस कोणी पाठवली, हीच खरात-चाकणकर जोड्याची चाल असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. (State Womens Commission)
चाकणकर फरार होण्यापूर्वी त्यांना अटक करा, अन्यथा धमकीचे सात फोन मिळाल्याने मी पोलिस तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.फोन रेकॉर्ड्स (सीडीआर), संपत्तीचा तपास आणि समोरासमोर चौकशीची मागणी करत अंधारे म्हणाल्या, “कॅप्टन फाइल्समधील खुलासे थरारक आहेत.(Narco test Demand) गृहमंत्र्यांच्या तातडीच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन.” ईडीने खरात-चाकणकरांच्या परदेशी मालमत्तेचा शोध घ्यावा, असा आग्रहही त्यांनी केला. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, पोलिस तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.(Maharashtra Politics)
