Republican Party Of India (A) : रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार – रामदास आठवले

पुणे – प्रतिनिधी

रिपब्लिकन पक्षाला (Ramdas Athawale) सर्वसमावेशक स्वरूप देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा रामदास आठवले यांनी निर्धार व्यक्त केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या चार राज्यांत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली.(Republican Party)

पक्ष विस्तार आणि नियोजन
पोर्ट ब्लेअर येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करून पक्ष विस्ताराचे धोरण ठरवले जाणार आहे. पुण्यातही बैठक घेऊन स्थानिक नियोजन होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

मुंबई महापालिका आणि इतर मुद्दे

मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला जागा न मिळाल्यानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळांचे अध्यक्षपद आणि सदस्य पदे देण्याची ग्वाही दिली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी आणि भोंदू बाबा प्रकरणात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.(National Party )

पुणे शहराध्यक्ष स्पष्टीकरण (Pune )
पुणे शहर रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत शहराध्यक्ष संजय सोनवणे असून, त्यांचा तीन वर्षांचा कालावधी सुरू आहे. इतर कोणत्याही दाव्यांना घटनाविरोधी असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
रामदासजी आठवले यांच्या हस्ते बीएसपी, चलवादी माळा विकास महासंघ आणि इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश झाला. यात हुलगेश मर्याप्पा चलवादी, अनिल कुमार त्रिपाठी, भीम सिंह चलवादी, दीप चिंचोलीकर, अविनाश मस्के यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *