Pune ACB Trap News : पुण्यात महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्याला दणका २ लाख रुपयांची लाच घेताना ACB ने रंगेहाथ पकडले

पुणे – प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर‑आंबेगाव येथील उपविभागीय अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६) यांना बांधकाम व्यावसायिकाकडून २ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)(ACB raid ) रंगेहात पकडले. ही कारवाई मंचर येथील त्यांच्या कार्यालयात दुपारी सापळा रचून करण्यात आली. (Pune Corruption )
तक्रारदार यांनी पुणे‑नाशिक महामार्गाजवळील नारायणगाव येथील जाँईंट व्हेंचरमध्ये इमारत उभारली आहे.(Lach anews )

इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याने त्यांनी अंशत: पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी जुन्नर‑आंबेगाव उपविभागीय कार्यालयात प्रस्ताव दाखल केला. नगररचना विभागाकडून “ना हरकत प्रमाणपत्र” आल्यानंतर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आला होता. (Pune Crime )

गेल्या आठवड्यात तक्रारदार प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी अंशत: पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली व तडजोडीत ही रक्कम तब्बल २ लाखांपर्यंत कमी केली. यावरून तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. तपासात लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी सापळा रचून रोख रक्कम घेताना शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली असून, जिल्ह्यात महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *