Pimpri Chinchwad : अशी आई कोणाच्याही नशिबात येऊ नये ! संपूर्ण प्रकरण वाचून उडेल थरकाप

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातून अंगावर थरकाप उडवणारी घटना समोर येत आहे .प्रेम संबंधात अडथळा येत असल्याने आईनेच बॉयफ्रेंड च्या मदतीने पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्याचा बादलीमध्ये डोके पाण्यात बुडवून व भिंतीवर आपटून निर्घृण हत्या केली . (Child Murder) मुलाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बीड जिल्ह्यात नेला. अन हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे तिने नातेवाईकाना भासविण्याचा प्रयत्न केला .(NoMotherLikeThis )

अवेज मेहबूब शेख (वय ६) (AvejSheikh)असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या आई बसरीन मेहबूब शेख (वय २७, रा. कुरुळी, मूळ धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड) आणि प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, मूळ पुस, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी चार एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास कुरुळी येथील घरात ही घटना घडवली. फिर्याद इसाक महमद शेख (वय ४९, पुस, ता. अंबेजोगाई, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून दक्षिण महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बसरीन आणि कजेवाड यांनी अवेजला बाथरूममध्ये नेले. तेथे बादलीतील पाण्यात त्याचे डोके बुडवले आणि भिंतीवर आपटले. मुलाचा मृत्यू झाल्यावर दोघांनी मृतदेह बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या बसरीनच्या मूळ गावी नेला. तेथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनावट प्रकार रचला.(LoveAffairKilling)

संशय आणि तपास

धर्मापुरीतील नातेवाइकांना हा बनावट प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शवविच्छेदन करायला सांगितले. अहवालात अवेजचा मृत्यू पाण्यात बुडवल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत बसरीनने गुन्हा कबूल केला. बीड पोलिसांनी ही माहिती दक्षिण महाळुंगे पोलिसांना कळवली.
बसरीनला अटक करून न्यायालयात हजर केले असता १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रियकर कजेवाड फरारी असून, विशेष पथक त्याच्या शोधात आहे. दक्षिण महाळुंगे (Dakshin Mahalunge)पोलीस तपास करत आहेत.(KuruliMurder)
संतोष जायभाई, पोलिस उपनिरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *