Hadapsar : हडपसरच्या डॉक्टारांनी गमावले १२ कोटी ; सायबर चोरट्यांचे कांड …. वाचा सविस्तर

पुणे -प्रतिनिधी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. हडपसरमधील भोसलेनगर भागातील ७५ वर्षीय निवृत्त डॉक्टरांनी (HadapsarDoctor ) अवघ्या १ महिना २१ दिवसांत तब्बल १२ कोटी ३१ लाख रुपये (12CroreScam) सायबर चोरट्यांना गमावले.(CyberFraud ) या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

जानेवारी महिन्यात डॉक्टरांच्या मोबाईलवर “VIP Stock 24” व्हॉट्सअॅप ग्रुपमार्फत संपर्क साधण्यात आला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास ११ दिवसांत पैसे दुप्पट होतील, (ShivajinagarPolice )असे आमिष दाखवून त्यांना फसवले. प्रथम काही लाखांची गुंतवणूक केल्यानंतर खोटा नफा दाखवून विश्वास बसवला. त्यानंतर दिवसाला ३ कोटीपर्यंत पैसे मागितले गेले.(PuneCyberCrime )

डॉक्टरांनी दोन बँक खात्यांतून वेगवेगळ्या वेळी ऑनलाइन ट्रान्सफर करून एकूण १२ कोटी ३१ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यांमध्ये जमा केले.(InvestmentScam) चोरट्यांनी ५४ कोटींचा खोटा परतावा दाखवला, पण प्रत्यक्षात एक रुपयाही परत दिला नाही. फसवणूक लक्षात येताच सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.(CyberAlert)

सायबर पोलिसांनी बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी सुरू केली असून, संबंधित बँकेशी पत्रव्यहार केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना अज्ञात संदेश, व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा शेअर गुंतवणुकीच्या आमिषापासून सावध राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.(StockMarketScam)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *