पुणे -प्रतिनिधी
पुण्याच्या वडकी परिसरातील पीर वस्तीत राहणाऱ्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील हवालदार हनुमंत गुलाब कांबळे याला पत्नीच्या कौटुंबिक छळ तक्रारीनंतर पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी तात्काळ निलंबित केले आहे. (Kalepadal ) कांबळे याने पत्नी पूनम कांबळे यांच्यावर वर्दीचा धाक दाखवून शारीरिक व मानसिक छळ केला तसेच अनैतिक संबंध लपवले, अशी तक्रार काळेपडळ पोलिस ठाण्यात नोंदवली गेली आहे.(PoliceSuspended)
पबमधील खोटी ड्युटी व छळाचा सिलसिला
कांबळे याने पत्नीला “कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी” आहे असं खोटं सांगून १५ जून २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड येथील सी डॉक पबमध्ये महिलेसोबत दारू पिऊन आनंद लुटला.(HanumantKambale ) पत्नीने प्रत्यक्ष पकडल्यावर “मी पोलिस आहे, तू काही करू शकत नाही,” असं म्हटलं.(WifeAbuse) विवाह २००३ पासून दोन मुले असून दीड वर्षांपासून उशिरा येणं, मारहाण, शिवीगाळ व घटस्फोटाची धमकी दिली जात होती.(PubScandal )
निलंबनाचे कारण व पोलिस कारवाई
कांबळे याच्या अशा गैरवर्तनामुळे शिस्तबद्ध पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवून निलंबनाचे आदेश जारी झाले. (ExtramaritalAffaire)कांबळे व महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलिसांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
