Pune Crime : ब्युटी पार्लर चालक तरुणीची गळा दाबून हत्या ; रस्त्याच्या कडेला सापडली बॉडी , पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण समोर

पुणे -प्रतिनिधी

मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत केशवनगर कचरा डेपो परिसरात ब्युटी पार्लर चालक आफरीन सलीम पठाण (२९, रा. वडगाव शेरी)(AfrinPathan ) याचा गळा दाबून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .(MundhwaMurder ) दरम्लयान लहान बहीण अरबिना सय्यद (२४) यांच्या फिर्यादि नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपी पसार आहे.(BeautyParlorKilling)

मंगळवारी (५ मे) सायंकाळी ग्राहकाच्या कॉलवर घरी जाऊन ब्युटी सेवा देण्यास गेली असताना त्यांची हत्या झाली.(StrangledDead) मृतदेह रस्त्यावर सापडल्यावर प्रथम अपघात वाटला,(Keshwanagar) पण शवविच्छेदनात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले . दरम्यान कचरा डेपो जवळ सीसीटीव्ही नाहीत .पोलिसांकडून तपास सुरु आहे .(#VadgaonSheri)

वरिष्ठ अधिकारी व तपास
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक व वरिष्ठ निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पी.नि. सागर गोडे तपास करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरात भीतीचे वातावरण आहे.(PuneCrime )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *