Junnar Murder : लग्न लावून देत नसल्याने ..पोटच्या मुलाने बापाला अन लहान भावाला दगडाने ठेचून केले खल्लास …. रात्रभर बॉडीशेजारी झोपला !

पुणे : प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील बगाडवाडी येथे “लग्न लावून दिले नाही” या कारणावरून संतापलेल्या मुलाने वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Junnar Double Murder) या दुहेरी हत्येमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बाबाजी जयराम मुकणे (Babaji Jayram Mukhne) (रा. बगाडवाडी, पारगाव तर्फे मढ, ता. जुन्नर) याला ओतूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने वडील जयराम महादू मुकणे (Jayram Mahadu Mukhne) (वय ६५) व भाऊ राजू उर्फ राजेंद्र जयराम मुकणे (Raju Jayram Mukhne) (वय ३०, रा. बगाडवाडी) यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी युवराज जयराम मुकणे यांनी फिर्याद दिली आहे.

ओतूर पोलीस ठाण्याचे (Oture Police Station)निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबाजीचे लग्न झाले असले, तरी पत्नी गेल्या चार–पाच वर्षांपासून माहेरी राहते. त्यामुळे “माझे दुसरे लग्न लावून द्या” असा तो वडील आणि भावाकडे सतत तगादा लावत होता. वडील व भाऊ लग्न लावून देत नसल्याचा राग मनात ठेवून बाबाजीने बगाडवाडी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रथम लाकडी चोपणीने मारहाण केली आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून दोघांची हत्या केली. घटनांनंतर तो काही काळ मृतदेहांजवळच झोपल्याचेही समोर आले आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

दरम्यान, संभाजीनगरातील पैठण शहरात अवघ्या १२ तासांच्या अंतरात दोन खुनांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. मंगळवार २ जून रोजी रात्री रेणुका अपार्टमेंटसमोर किरकोळ वादातून अमोल अहिरे (वय १७) या अल्पवयीन तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. छाती व पोटावर वार झाल्याने अमोल जागीच कोसळला. या प्रकरणी विकास पांडुरंग पवार, ईश्वर भाऊसाहेब दगडे आणि एका अल्पवयीनास विरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *