पुणे -प्रतिनिधी
अती राग माणसाला किती थराला नेऊ शकतो ,याचे एक अत्यंत भीषण आणि सुन्न करणारे उदाहरण शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथून समोर आले आहे बाभुळसर बुद्रुक (Babhulsar Budruk)भागात राहणाऱ्या 84 वर्षीय वृद्धाची एका लोखंडी गजाने हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा लाडका नातूच असल्याचे निष्पन्न झाले आहे . सोमनाथ नावाच्या या नराधम नातवाने आपल्या आजोबाची अतिशय क्रूरपणे हत्या केली .(Shirur)
नेमकं काय आहे प्रकरण ?
दशरथ राऊत (Dashrath Raut)हे नातू सोमनाथ (Somnath Raut) याला शेतातील कामांबाबत सूचना देत होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सोमनाथला राग अनावर झाला आणि नातू सोमनाथने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर जोरदार वार केले. या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले.
डोक्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध आजोबांचा स्वतःच्या नातवाकडून झालेला खून समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे (Grandson Kills Grandfather)
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील (Vinod Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. (Murder Case) पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला आणि काही तासांतच सोमनाथ राऊत याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
