Pune Crime : लग्नास नकार दिल्याने राग डोक्यात गेला , तीन वर्षाच्या चिमुकल्याचा घेतला जीव

पुणे -प्रतीनिधी

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे .महिलेने लग्नास नकार दिल्याने रागात एका तरुणाने तिच्या तीन वर्षाच्या मुलाची अमानुष मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे .(Crime In Pune)

मृत बालकाचे नाव अंशू पप्पू कोल (वय 3) असे आहे.

मिळलेल्या माहितीनुसार मुलाची आई राणी पाप्पू कोल (वय 25, रा. कारेगाव; मूळ रा. मध्य प्रदेश) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार पोलिसांनी देवांशू आदित्य साहू (Arrest Devanshu)(वय 24, रा. बरटोला, ता. अनुपपूर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.(Stop Child Abuse)

फिर्यादीच्या तक्रारीनुसार राणी कारेगाव येथील कल्याणी कंपनीच्या मागील परिसरातील भाड्याच्या खोलीत राहतात. आरोपी देवांशू याने राणीवर लग्नासाठी दबाव टाकला होता.(Child Protection) राणीने तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांकडे देऊन देवांशूंशी लग्न न करण्याचा ठाम निर्णय घेतला. हा नकार मनास धरून देवांशूने बुधवारी (दि. 17) दुपारी सुमारे 12.30 ते सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घरात कोणी नसताना अंशू याला अमानुष मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नोंदवले.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. आरोपीला गुरुवारी (दि. 18) पहाटे मध्य प्रदेशातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *