पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील महंमदवाडीमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. येथील काळेपडळ पोलिस ठाण्यामध्ये रविवारी (दि. ९) रात्री १०:३० च्या सुमारास एक व्यक्ती रक्ताने माखलेल्यां अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच त्याने आरडाओरडा करत सांगितले की, मी नुकतीच मी सैफन सय्यदचा खून केला आहे आता मी तुम्हाला शरण येत आहे. हे ऐकून तेथे उपस्थित सारे पोलिसही चक्रावले. पोलिसांनी तात्काळ त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याची चौकशी केली. आरोपीने स्वत:च्या गुन्ह्याची देत संपूर्ण घटना सांगितली.(Kalepadal) भाच्याच्या विस्कटलेल्या संसाराच्या रागातून त्याने त्याच्या सासऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घालून निर्घृण खून केला . (Pune)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सैफन सय्यद यांची मुलगी सना हिचा विवाह आरोपी हनुमंत कांबळे यांचा भाचा लखन काळोखे याच्याशी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी लखन याचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर सना सासरी व्यवस्थित राहत नसल्याचे सांगितले जात आहे.
रविवारी सासरच्या मंडळींसोबत वाद झाल्यानंतर सना रागाच्या भरात जंगलाच्या दिशेने निघून गेली. तिचा शोध घेण्यासाठी वडील सैफन सय्यद आणि हनुमंत कांबळे हे दोघे महंमदवाडी येथील लक्ष्मी पार्कजवळील जंगल परिसरात गेले.
वादाचे रूपांतर हाणामारीत जंगलातील सिमेंटच्या टाकीजवळ सना सासरी राहत नसल्याच्या कारणावरून सैफन सय्यद आणि हनुमंत कांबळे यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर संतप्त झालेल्या कांबळे याने तेथे पडलेला मोठा दगड सैफन सय्यद यांच्या डोक्यात मारला.
या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने सैफन सय्यद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेठे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता सैफन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे करत आहेत. आरोपी हनुमंत कांबळे याला अटक केली आहे याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत..
