Ajit pawar …रोहित पवारांच्या त्या वक्तव्यावर …. “अजितदादांसाठी राजकारण करू नका, सत्य लवकर समोर येईल” असे का म्हणाले मोहोळ

पुणे -प्रतीनिधी

अजित (Ajit pawar)पवारांच्या विमान अपघातप्रकरणात राजकीय खेचर चालू असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol)यांनी शनिवारी स्पष्ट शब्दांत सर्वांना राजकारण थांबवण्याचे आवाहन करून सांगितले की, ब्लॅकबॉक्समधील डेटा विश्लेषणानंतर सत्य समोर येईल, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असून केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे, म्हणून रोहित पवारांसारख्यांनी (rohit pawar ) आता बोलणं थांबवावं.वॅमनीकॉमच्या पदवीदान समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, “अजितदादांसारखा मोठा नेता गेला, पुणे व राज्याचं नुकसान झालं. ()ajit pawar accident )

सगळेजण दुःखात आहेत, तरी गेल्या पाच-सहा दिवसांत कोणी काय बोलतंय? चौकशी-अहवालानंतर बोला, आता राजकारण करू नका.” निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः जिल्हा परिषदेत प्रचार न केल्याचं सांगितलं, “मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द केल्या, निवडणूक (election)म्हणजे युद्ध असतं पण अशा वेळी प्रचार योग्य नाही. राष्ट्रवादीची सत्ता (Ajit pawar) असली तरी मतदार सुज्ञ आहेत, निकाल स्पष्ट करेल.”संसदेतील गदारोळावर बोलताना मोहोळ म्हणाले, “राहुल गांधींचं करणं भाजपला फायदंच होतं, त्यांना शुभेच्छा!” या विधानाने अपघातप्रकरणी राजकीय संभ्रम कमी होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *