Amol Kolhe : ३३ जिल्हापरिषद जागांसाठी घड्याळ चिन्ह; अमोल कोल्हेंनी विचारले उत्तरे

पुणे -प्रतिनिधी

अजितदादा पवार (Ajit Pawar )यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असले तरी शरद पवार गटाकडूनच याबाबत दावा केला जात आहे. अजितदादा गटाचे नेते या मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत असाताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलत विलीनीकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.अमोल कोल्हे यांनी सांगितले की, अजित पवार यांचा अपघातात मृत्यू होऊन २० दिवस झाले तरी चौकशी अहवाल का येत नाही, हे दुर्दैवी आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) प्रश्न उपस्थित करीत असल्याने त्यात तथ्य असू शकते, तरीही संपूर्ण चौकशी अपरिहार्य आहे.

त्यांच्या पक्षातील नेते चौकशीबाबत का बोलत नाहीत, हे त्यांच्याकडून विचारा, असा चिमटा त्यांनी काढला.विलीनीकरणाबाबत कोल्हे म्हणाले की, शिरूर मतदारसंघातील ३३ जिल्हा परिषद जागांसाठी घड्याळ चिन्हावर लढलो; उमेदवारांच्या एबी फॉर्मवर कोणाची सही होती, हे तपासा. माजी आमदार अशोक पवार (Amdar Ashok PAwar )यांच्या पत्नी व अंकिता पाटील (Ankita Patil ) यांना घड्याळ चिन्हावर कोणी उभे केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आमची चर्चा अजितदादांसोबतच झाली होती, त्यामुळे साफ होईल.

अजित पवार (Ajit Pawar ) यांच्याशी शेवटची भेट १८ जानेवारीला हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झाली असता जेवणावेळी त्यांनी मला ‘डॉक्टर, तुम्ही अजून डाएट पाळता का’ म्हणून हसवले होते, हीच शेवटची आठवण, असे भावूक होऊन कोल्हे (Kolhe) यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *