Accident : क्रेन पट्टा तुटून महिलेच्या डोक्यावर पडला ….कामगार महिलेचा मृत्यू वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी

.रामटेकडी औद्योगिक वसाहतीत खासगी कंपनीजवळ लोखंडी जिना उभारताना क्रेनचा पट्टा तुटल्याने ४७ वर्षीय वैशाली मारुती भोसले (Vaishali Maruti Bhosale) यांच्या डोक्यावर जड सळई कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला.(Pune accident)

हडपसर (Hadpsar) येथील गोसावी वस्तीची वैशाली भोसले या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत होत्या. क्रेनद्वारे सळई उचलताना अपघात झाला असता सहकाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मुलगा चेतन भोसले (२१) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून क्रेन चालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला (Crime)आहे.

प्राथमिक तपासात क्रेन उपकरणांची देखभाल आणि सुरक्षाव्यवस्था अपुरी असल्याचे निष्पन्न झाले असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. औद्योगिक क्षेत्रात हेल्मेट, सेफ्टी गिअर आणि यंत्रसामग्री तपासणीची कमतरता पुन्हा उघड झाली असून कडक कारवाईची मागणी होत आहे.(Pune)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *