पुणे -प्रतिनिधी
राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास परवानगी दिली आहे. विशेष हेतू प्राधिकरण (SPV) स्थापन होईल आणि पुढील महिन्यात निधी उपलब्ध होईल.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, ३ हजार एकर जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांच्या (Farmers ) बँक खात्यात थेट जमा होईल. ९६% शेतकऱ्यांनी संमती दिली असून, आचारसंहितेनंतर मंत्रिमंडळाने कर्ज मंजूर केले.(Purandar Airport)
SPV मध्ये MIDC, MADC आणि CIDCO ची भागीदारी असेल.एरोसिटी विकास: विमानतळाबाहेरील शेतकऱ्यांची (Farmers ) अतिरिक्त जमीन एरोसिटी गाठील. मोबदल्यात १०% विकसित भूखंड परत मिळेल. मोजणी सुरू असून सिडको अंतिम निर्णय घेईल. रिंगरोडप्रमाणे चेकऐवजी डायरेक्ट ट्रान्सफर होईल.(Purandar Airport)
