Budhwar Peth : बुधवार पेठेतील त्या गुप्त कुलूपबंद खोलीत चार अल्पवयीन मुली सापडल्या … धक्कादायक माहिती समोर

पुणे -प्रतीनिधी 
पुण्यातील बुधवार पेठेत  (Budhwar Peth )पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये  (Police Combing Operation )गुप्त खोलीत कुलूप लावून ठेवलेल्या चार अल्पवयीन मुली आढळून आल्या. “जुना माल” असा खोडा घालण्याचा प्रयत्न झाला असला तरी पोलिसांनी कुलूप तोडून मुलींची सुटका केली.(crime news)
स्वतःला पालक सांगणाऱ्यांकडे कोणतेही कागदपत्रे नसल्याने मुलींची ओळख पटविणे कठीण झाले आहे. कथित पालकांचे हावभाव, चेहरे आणि नावांमध्ये विसंगती दिसते. पोलिसांनी मानवी तस्करी, अमली पदार्थ कायदा आणि बेकायदा वास्तव्याचे गुन्हे दाखल केले. दोन परदेशी महिलांच्या बनावट ओळखपत्रांचा तपास सुरू आहे.(Budhwar Peth)
मुलींनी वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याने पोलिसांनी बालकल्याण समितीकडे पत्र पाठवले. समुपदेशन सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रडारवर संशयित पोलिस कर्मचारी असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *