Hardik Pandya News : हार्दिक पंड्यांवर तिरंग्याचा अवमानाचा आरोप; पुण्यात वकिलाची पोलिस तक्रार

पुणे प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू हार्दिक पंड्या सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असतानाच पुण्यातील वकीलाने त्यांच्याविरोधात तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप करीत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Hardik Pandya News)

टी-२० वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषात (Pune News)हार्दिक पंड्या आणि त्यांच्या मैत्रिणीसोबतचा व्हिडिओ जोडला असून, त्यात पंड्याच्या खांद्यावर तिरंगा असताना ‘अश्लील चाळे’ केल्याचा आरोप अॅड. वासिद खान यांनी केला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करून ट्रॉफी जिंकली होती.(T20 WorldCup) विजयानंतर मैदानावर खेळाडू आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा जल्लोष झाला.(Hardik Pandya)

अॅड. खान यांनी राष्ट्रीय गौरव अवमान अधिनियमांतर्गत कारवाईची मागणी केली आहे.(TricolourInsult)

चौकट: सोशल मीडियावर ट्रोलिंगचा भडका
विजयसोहळ्यातील पंड्या आणि मैत्रिणीच्या ‘विक्षिप्त डान्स’ व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून टीका सुरू केली आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये आक्षेप घेतला असून, याच व्हिडिओवरून ही तक्रार दाखल झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *