Pune crime : खाकीचा धाक दाखवून महिलांसोबत केले मोठे कांड… आंध्रप्रदेशात लपून बसला होता तो पोलीस … अखेर पुणे पोलिसानी ठोकल्या बेड्या

पुणे- प्रतिनिधी

पुणे शहरात खाकी (khaki )वर्दीचा धाक दाखवून अनेक महिलां आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (५२ वर्षे) (police ganesh jagtap )अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गेल्या चार-पाच महिन्यांपासून फरार असलेल्या जगतापला भारती विद्यापीठ (bharti vidhyapith police station)पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून अटक केली.जगतापवर पुणे शहरात एकामागोमाग फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कोथरूड (kothrud )प्रकरणात त्याने एका महिलेकडून १७ लाख रुपये रोख आणि ७३ तोळे सोन्याचे दागिने घरगुती अडचणींचे खोटे कारण सांगून घेतले. भारती विद्यापीठ प्रकरणात पार्लर व्यावसायिक महिलेला मुलीच्या शिक्षण आणि आजारपणाचे कारण सांगून २.५ लाख रुपये आणि ६ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. चतुःश्रृंगी (औंध) प्रकरणात सराफ व्यावसायिकाला निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी करून गंडा घातला.ऑगस्ट २०२४ मध्ये विशेष शाखेत बदली झाल्यानंतरही हजर न झाल्याने जगतापला निलंबित करण्यात आले आणि तो फरार झाला.

तांत्रिक तपासातून तो आंध्रप्रदेशातील फुलपथरू गावात लपला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते (dcp milind mohite) आणि वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक स्नेहल थोरात यांच्या पथकाने आंध्रप्रदेश गाठून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *