पुणे -प्रतिनिधी
बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणारी फरासखाना पोलिस ( farsakhana police station)ठाण्यातील महिला कर्मचारी निलंबित करण्यात आली. तिने वरिष्ठांना माहिती न देता तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री बुधवार पेठेत मोठे कोम्बिंग ऑपरेशन (combing operation) राबवले. (Pune crime Budhwar peth)
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शोध विभागाच्या युनिट्सचा फौजफाटा रात्री १२ वाजता दाखल झाला. सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून शुक्रवार पेठ पोलिस चौकीजवळील कुंटणखान्यांमध्ये झाडाझडती घेतली.महिला पोलिसांनी ५० घरांतील महिलांची चौकशी केली. अमली पदार्थ विक्री, जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Pune crime Budhwar peth :)आणि बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य या मुद्द्यांवर संशयितांची विचारले.
रात्री १२ ते पहाटे ३ पर्यंत कारवाई सुरू होती. प्रत्येक गल्लीबाहेर नाकाबंदी केली होती.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घटना थांबवण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे.(pune crime)
