Lonavala Crime : लोणावळा टायगर पॉइंटवर आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या: ‘आय लव्ह यू रिया’ मेसेज पाठवून दरीत उडी

पुणे -प्रतिनिधी

लोणावळा, पर्यटनाचे प्रमुख केंद्र, सध्या सलग आत्महत्यांच्या घटनांमुळे थरारले आहे. पुण्यातील बाणेर येथील आयटी कंपनीतील ३३ वर्षीय वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा यांनी सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून टायगर पॉइंटवरून (Lonavala Tiger Point)दरीत उडी घेतली, ही धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेचे सविस्तर वर्णनवीरेंद्र हे मूळचे नागपूर जिल्ह्यातील मोलशी तालुक्यातील मनकापूरचे होते. बाणेर येथील नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणारे हे दांपत्य आपल्या पत्नी रियासोबत पुण्यात राहत होते.(Lonavala Crime )

बुधवारी त्यांचा वाढदिवस साजरा करत नातेवाईकांसोबत केक कापला. गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांनी रियाला भावुक संदेश पाठवला: “आय लव्ह यू रिया… कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू. माझी गाडी टायगर पॉइंटला आहे, चावी पुढील टायरखाली, मोबाईल कॅबिनेटमध्ये.” हा मेसेज पाहून रियाने तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीसांना कळवले. (Lonavala Crime )पोलिसांनी टायगर पॉइंटवर जाऊन गाडी सापडली, पण वीरेंद्र दिसले नाहीत. शिवदुर्ग बचाव पथक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने सायंकाळी ४.३० वाजता २५० फूट खोल दरीतून मृतदेह (Deathbody) बाहेर काढण्यात आला. तपास उपनिरीक्षक सागर अर्गडे (PSI Sagar Agarde) करत असून, मोबाईलमधील व्हिडिओ व संदेशांतून कंपनीतील वरिष्ठ प्रीती शर्मा, जयदीप नंदा यांचा सहकाऱ्यांचा छळ दिसून आला.कायदेशीर कारवाईया प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सहा जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Lonavala Crime)

वीरेंद्र यांच्या मोबाईलमधील पुरावे महत्त्वाचे ठरले असून, कंपनीतील कार्यसंस्कृतीवर प्रश्न उपटले आहेत. दोन महिन्यांत टायगर पॉइंटवर (Tiger Point )ही तिसरी आत्महत्या असल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *