पुणे -प्रतिनिधी
सीमा शुल्क विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune Airport ) बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवलेला ५ कोटी ४२ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (Ganja ) जप्त केला. ११ फेब्रुवारी रोजी एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express )विमानातून आलेल्या ३२ वर्षीय तरुणाच्या संशयास्पद हालचालींमुळे सखोल तपासणी झाली.
कारवाईचे तपशीलप्रवाशाच्या बॅगेत ५ खेळण्यांच्या बॉक्समध्ये कार्बन पेपरमध्ये गुंडाळलेले ५ किलो ४२९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा सापडला. हा अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेला उच्च दर्जाचा अंमली पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात महागडा आहे. एनडीपीएस (NDPS ) कायद्यांतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली.(Pune Airport)
तपास सुरूप्रवाशाने चौकशीत समाधानकारक उत्तर दिले नाही. गांजा कोणाकडून घेतला, भारतात कोणाला विकला जाणार आणि मागे मोठे जाळे आहे का, याचा तपास जोरदार सुरू आहे. पुण्यात (Pune )अंमली तस्करीचे प्रमाण वाढल्याने विमानतळावरील तपासणी कडक करण्यात आली आहे.(Pune Airport)
