Rohit pawar … अजित पवार यांच्या अपघातावर रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा …

पुणे -प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar )यांच्या २८ जानेवारीच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ‘वैद्यकीय विसंगती’चा धक्कादायक मुद्दा उपस्थित केला. अपघातानंतर अजितदादांचा मृतदेह असामान्यपणे फुगलेला असल्याचा दावा करून त्यांनी घातपाताची शक्यता सूचित केली.

रोहित पवारांची पत्रकार परिषद: रोहित पवार म्हणाले, (Rohit pawar)
“डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दादांची बॉडी खूप जास्त फुगली होती. विमानाला आग लागून स्फोट झालेल्या अपघातात असा प्रकार सामान्य नाही.” यापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरील फोटोंचा दाखला देत असाच संशय व्यक्त केला होता.राजकीय खळबळ: या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धक्का बसला.

अपघात सामान्य नव्हता की घातपात होता, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

राष्ट्रवादीतील नेते आक्रमक झाले असून, स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरली आहे.

अजित पवार अपघाताचा सारांश: (ajit pawar accident )
२८ जानेवारीला झालेल्या या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, पण आता वैद्यकीय पुराव्यांमुळे गूढ गडद झाले आहे.या संशयास्पद विधानाचा पुढील खुलासा काय असेल, हे पाहणे महत्वाचे आहे. रोहित पवारांनी तपासासाठी केंद्राकडे विनंती करण्याचा इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *