पुणे – प्रतिनिधी
पुणे शहरात लग्नाचे (marraige)आमिष दाखवून तरुणीला प्रेमजालात अडकवणे, लैंगिक शोषण करणे आणि आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune crime ) २६ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनप्रीत सिंग कॅथ ऊर्फ करण (३५, रा. सप्तर्षी टॉवर, जनकल्याण नगर रोड, मालाड वेस्ट, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार जून २०२५ पासून गेल्या काही महिन्यांपर्यंत चालू होता.फसवणुकीची (fraud)सगळी कथाआरोपी मनप्रीतसिंगने सोशल मीडियाद्वारे फिर्यादीशी मैत्री केली.
प्रेमाचे (love commitment) आश्वासन देऊन लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर, “तू तुझ्या नावाने फायनान्स ॲपवरून कर्ज घे, मी हप्ते भरतो,” असे सांगून विविध ॲप्सवरून एकूण २ लाख ७० हजार ५०० रुपयांचे कर्ज (loan)काढायला लावले. हे पैसे आरोपीने स्वत:च्या वापरासाठी घेतले, (Pune crime ) पण हप्ते भरले नाहीत. याशिवाय, “दोन तासांसाठी मोबाइल द्या,” असे सांगून तरुणीचा ७५ हजार रुपयांचा मोबाइल घेऊन पळून गेला.
