Pune crime : गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – प्रतिनिधी

लोहगाव पोलीस ठाण्याच्या (lohgav police station) हद्दीत गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक थांबवण्यात युनिट-४ गुन्हे शाखेच्या (crime branch unit 4) पथकाला यश आले. दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी साठे वस्ती, लेन नं. ८ येथील कृष्णा मार्टजवळील सापळ्यात पिवळसर अशोक लेलंड दोस्त टेम्पो (MH 12 XM 4874) रोखण्यात आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव  (Pi kanchan jadhav )यांच्या नेतृत्वाखाली स.पो. उपनिरीक्षक प्रवीण राजपुत व पो.ह. सुभाष आव्हाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली. टेम्पो चालक नगाराम देवाराम जाट (३१, रा. ड्रिम स्क्वेअर सोसायटी, लोहगाव) ताब्यात घेतला असून, त्याच्याकडून ६,३०,९६० रुपयांचा प्रतिबंधित माल व ७ लाख रुपयांचे टेम्पो जप्त केले. एकूण मुद्देमाल १३,३०,९६० रुपयांचा असून, त्याच्यावर भा.न्या.सं.२०२३ कलम १२३,२२३,२७४,२७५, सिगारेट व अन्य तंबाखू अधिनियम २००३ कलम ७(२),२०(ब) व अन्न सुरक्षा अधि.२००६ कलम २६(i)(iv) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरील उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार,(cp amitesh kumar ) पो.सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पो.आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, .पो.उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, .सहा.पो.आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक व युनिट-४ पथकाला जाते. यात सह. पो. उपनिरीक्षक प्रवीण राजपुत, पो.ह. प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, चालक पो.ह. शरद झांजरे व महिला पो.अंमलदार मयुरी नलावडे, रोहिणी पांढरकर यांनी केली आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *