Pune crime …जिथे काम करायचा तिथेच केली चोरी ; हडपसर परिसरात असलेल्या त्या शोरूममधून चोरले लाखों रुपये … गुन्हे शाखेने २४ तासात चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

पुणे- प्रतिनिधी

जिथे काम करायचा, तिथेच मालकाच्या रोख रकमेवर डल्ला मारला! हडपसर येथील कामठे बाईक्स (kamthe bike showroom) शोरूमचे कामगार बापुराव संदीपान गायकवाड (२५) ने काऊंटर ड्रॉवरमधील २ लाख ७० हजार रुपये चोरून पळून गेला होता. अवघ्या २४ तासांत गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर पथकाने चोरलेल्या पैशांसह त्याला ताब्यात घेतले असून, ३ लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे (pune crime)

दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास हडपसर येथील कामठे बाईक्स शोरूममधील काऊंटर ड्रॉवरमधील कामगारांच्या पगारासाठी ठेवलेली २,७०,००० रुपये रोख रक्कम कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची फिर्याद तक्रारदार संतोष प्रल्हाद कामठे (वय ४६, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस स्टेशनला दिली .(hadpsar police station)

त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड (pi sudarshan gaikwad) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०६ च्या पथकाने तपास सुरू केला. तक्रारदाराकडेचे कामगार बापुराव संदीपान गायकवाड (वय २५, सध्या रा. वडकी नाला, कैलास नगर; मूळ निळज, करमाळा) हा चोरीचा प्रमुख संशयित असल्याची गोपनीय माहिती प्रशांत कर्णवर व अमित कांबळे यांना मिळाली. पुढील तपासात पो.उपनिरीक्षक अभिजित पवार, पो.हवलदार प्रशांत कर्णवर ,तानाजी देशमुख नानासाहेब मोरे , अमित कांबळे व नासिर देशमुख यांनी लोणी काळभोर येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २,५९,८०० रुपये रोख रक्कम, चोरीनंतर पळण्यासाठी वापरलेली अॅक्टिव्हा मोपेड (MH-12/EE-7101) व मोबाईल असा ३,१७,८०० रुपयांचा माल जप्त केला. आरोपीला हडपसर पोलीस स्टेशनला सोपवण्यात आले.

सदरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि सुदर्शन गायकवाड(pi sudarshan gaikwad) पो.उपनि. अभिजित पवार (psi abhijit pawar)पो.हवलदार प्रशांत कर्णवर (pc prashant karnwara )तानाजी देशमुख( tanaji deshmukh) नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे (amit kamble) व नासिर देशमुख यांच्या पथकाने केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *