दत्तवाडी -प्रतिनिधी
पुण्यातील दत्तवाडी येथे धक्कादायक प्रकरण! २२ वर्षीय आदिल हुसेन पठाण (aadil pathan ) याने प्रेयसी सुप्रिया सुरज गायकवाड (supriya gaikwad) आणि तिच्या भाव तेजस कांबळे यांच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून २८ डिसेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या (sucide) केली. पर्वती पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आदिलच्या मोबाईलमधून भयानक मेसेजेस समोर:
सुप्रियाने आदिलला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट मेसेजेसमध्ये असे लिहिले होते -“तुला हातची नस कापायला सांगितली होती, ते तू केलं नाहीस, गळ्याची नस कापायला सांगितली होती, तेही तू केलं नाहीस””तुझा बाप तिथेच फाशी घेणार, मी तुम्हाला फाशीला पाठवणार”ती सतत पैशासाठी, सोन्यासाठी ब्लॅकमेल करत होती आणि खोट्या केसेसची धमकी देत होती. आदिलने नाकोडा व साखरीया ज्वेलर्सकडून तेजसच्या नावावर दागिने खरेदी केले होते, असे पावत्या सापडल्या.(pune crime )
पूर्वीही आत्महत्येचे प्रयत्न:
आदिलने यापूर्वी १८ ऑक्टोबर आणि २३ डिसेंबर २०२५ रोजीही गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. मृत्यूपूर्वी त्याने तेजसला व्हिडिओ कॉल केला होता. आदिलने नातेवाईकांना सांगितले होते की, सुप्रिया त्याला फसवत आहे.आदिलची आई शमा हुसेन पठाण यांच्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक वानखेड तपास करीत आहेत.
