पुणे:प्रतिनिधी
ताडीवाला रोड परिसरात लव्हबर्ड्स (छोटे पोपट) (Cat Vs Lovebirds )आणि मांजर यांच्यातील ‘वाद’ दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारीपर्यंत पोहोचला. ही घटना ८ मार्चला भारत मित्र मंडळासमोर घडली असून, आता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Pune Neighbour Fight)
अभिषेक सिंग यांच्या घरासमोर लव्हबर्ड्सचा पिंजरा ठेवलेला असतो. शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांची मांजर परिसरात मोकळे फिरते आणि पिंजऱ्याभोवती गुंतागुंत करते.(Tadiwala Road Clash) यामुळे सिंग कुटुंब त्रस्त झाले आणि त्यांनी मांजर मालकांना सावध राहण्यास सांगितले.(Pet Dispute GoneWild) मात्र, यावरून वाद भडकला. रस्त्यावर दोन्ही कुटुंबे आले, शिवीगाळ-धक्काबुक्की झाली आणि हाणामारीत अभिषेक सिंग जखमी झाले.
पोताबत्तोनी यांच्या आईने सांगितले, “आमची मांजर कुठे गेली याचा पत्ता नाही.(Viral Pune News) त्यांच्या घरीही मांजरी आहेत. मुक्या प्राण्यांचा वाद माणसांपर्यंत गेला.” सिंग यांनी तक्रार दाखल केली असून, दिनेश पोताबत्तोनी यांच्यावर बीएनएस कलम ११८(१) अंतर्गत गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. तपास सुरू आहे.(Pune Crime )
