Pune Crime : कोयत्यानं सपासप वार करत तरुणाची हत्या … सिंहगड रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुणे -प्रतिनिधी

सिंहगड रस्त्यावरील (Singhad Road Murder)सनसिटी परिसरात सोमवारी सायंकाळी तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला.(Sun City Killing) प्राथमिक तपासात वैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून, पळून गेलेल्या तिघा संशयितांना रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेतले.(Pune Crime News)

खून झालेल्या तरुणाचे नाव करण गिरीश काशीद (१९, रा. धायरी, सिंहगड रस्ता) असे आहे. (Youth Stabbed Dead)सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आठवडाभरापूर्वी करणचा काही जणांशी वाद झाला होता. (Police Arrest Suspects)सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो दुचाकीवरून सनसिटी परिसरातून निघाला होता. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याला अडवले आणि भर रस्त्यात कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. घटनेच्या उघडकीस यानंतर परिसरात घबराट उडाली.(Crime In Pune)

माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे निर्देश दिले. संशयावरून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, पुढील तपास सुरू आहे.(Pune Murder Case)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *