
पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी
वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला लक्ष्य करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या (crime branch unit 1) पथकाने अवघ्या एका तासात अटक केली(Pimpri Chinchwad) सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुचाकी चोरी असे तीन गुन्हे उघडकीस येत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला.पीएमपी बसथांब्यांवर दागिने चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने सीसीटीव्ही व तांत्रिक तपास केला.
निगडी बसथांब्याजवळ तीन महिलांनी वयोवृद्धेच्या गळ्यातील दोन लाखांचे मंगळसूत्र व गंठण चोरले. त्यांना ताब्यात घेत कर्नाटक-महाराष्ट्रातील चोरीचे गुन्हे उघड झाले. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.दिघीमध्ये घरफोडी करणाऱ्या संशयितासह सोने विक्री करणाऱ्या महिलेला अटक.
त्यांनी दोन घरफोड्या केल्याची कबुली देत दीड लाखांचे दागिने सापडले. दिघी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघड. तसेच, सांगवी पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरी प्रकरणात विधिसंघर्षित बालकाला पकडून दीड लाखांची दुचाकी जप्त.पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक निरीक्षक दत्तात्रय गुळीग व इतर पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
