
फुरसुंगी – प्रतिनिधी
पुणे परिसरातील फुरसुंगीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका १९ वर्षांच्या तरुणीला ब्लॅकमेल करून सोन्याचे दागिने लुटले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांनी नील भरत निंबाळकर (१९, रा. अष्टविनायक सोसायटी, फुरसुंगी) याला अटक केली आहे.(Pune Crime )
पीडितेच्या फिर्यादीनुसार हा प्रकार जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या सहा महिन्यांत घडला.सर्व कथा अशी सुरू झाली की, पीडित तरुणी रिक्षात प्रवास करत असताना ती दुसऱ्या तरुणासोबत असल्याचे आरोपी नीलने पाहिले. याचा फायदा घेऊन त्याने तिला धमकावणे सुरू केले. “तुझ्या भावाला-बहिणीला फोन करून तुझे अफेअर सांगतो, घरच्यांना सर्व काही सांगितले की तुझा नाश होईल,” अशा धमक्या देत त्याने तिच्यावर दबाव टाकला. प्रेमसंबंधाची बाब घरच्यांना कळू नये म्हणून घाबरलेल्या तरुणीने त्याच्या मागे वळले नाही. सुरुवातीला नीलने पैशांची मागणी केली, पण तिच्याकडे पैसे नसल्याने त्याने तिच्याकडील १०१ ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावले.दागिन्यांनंतरही त्याने वारंवार पैशांची मागणी चालूच ठेवली.
नकार मिळाल्यावर त्याने धमक्या वाढवल्या आणि शेवटी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे तरुणी तीव्र मानसिक तणावाखाली होती. शेवटी धैर्य गोळा करून तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून नीलला अटक केली असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने व अन्य पुरावे जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक नलावडे (psi nalawade )यांच्या नेतृत्वाखाली सखोल तपास सुरू असून, आरोपीवर ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि बलात्कारप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .