पुणे : प्रतिनिधी
डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता . (Deccan Police)या महिलेच्या घरातून ४७ ग्रॅम वजनाचे, सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली होती .या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासची चक्रे फिरवली , डेक्कन पोलिसांनी वेगवान तपास केला असता हा चोरीचा गुन्हा ८५ वर्षीय वृद्ध महिलेने सेवेसाठी घरी ठेवलेल्या केअरटेकरनेच केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे .(Pune Police)
केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या निरजकुमार दिनेशकुमार मिश्रा (वय ३७, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे .
डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलोस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपीला १८ ऑक्टोबर रोजी वाकड परिसरातून अटक करण्यात आला. त्याने गुन्हा कबूल केला असून चोरीचे दागिने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरात विकल्याचे सांगितले.(Theft Case) त्यानुसार पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये मोहीम राबवून ३४.४ ग्रॅम वजनाचे, ३ लाख ९१ हजार ५२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपीला न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.(Erand wane)
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०१ श्री. कृषिकेश रावले, श्रीमती अनुजा देशमाने, सपोआ विश्रामबाग विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस ठाणे रुणाल मुल्ला (Sr Pi Runal Mulla), पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, सहा. पोउपनि प्रशांत पवार, सहा. पोउपनि दत्तात्रय शिंदे, सहा. पोउपनि धनश्री सुपेकर, पोहवा सचिन गायकवाड, पोहवा वसिम सिध्दकी, पोहवा सागर घाडगे, पोशि स्वप्नील गायकवाड, पोशि संजय दंडगुले यांनी केलेली आहे.
