
पिंपरी चिंचवड – प्रतिनिधी
राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या पदकांमुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाचा डोळा भरला आहे. सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे (Add cp vitthal kubade) यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पदक तर पोलिस निरीक्षक अमोल फडतरे (PI Amol Fadtare) यांना दुसऱ्यांदा शौर्य पदक मिळाले आहे. ही दुसरीच वेळ आहे जेव्हा या आयुक्तालयातील दोन अधिकार्यांना एकाच वेळी राष्ट्रपतींचा सन्मान मिळाला आहे.सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे हे पिंपरी विभागाचे प्रमुख आहेत. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालय सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक मिळाले होते. १९९३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेल्या कुबडे यांची कारकीर्द नक्षलग्रस्त भागांतून सुरू झाली. (Pimpri Chinchwad )
भंडारा, गोरेगाव, सालेकसा, शिवहोरा येथे नक्षली चकमकांत यशस्वी कामगिरी करून त्यांनी नावलौकिक कमावला. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बुलडाणा आणि लातूर येथेही त्यांची चुणूक दिसली. २०१५ पासून पिंपरीत रुजू झालेल्या कुबडे यांनी गुन्हे शाखा, पोलिस ठाणी, वाहतूक विभाग सांभाळला. तडीपार, मोका, स्थानबद्ध कारवाया करून गुन्हेगारांना धडा शिकवला. त्यांच्या सेवाकाळात १२०० रिवॉर्ड, ४०० प्रशंसापत्र, विशेष सेवा पदक, अंतरिक सेवा पदक मिळाले आहेत.दरम्यान, पोलिस निरीक्षक अमोल फडतरे यांनाही दुसरे राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले आहे. २०१४ मध्ये उपनिरीक्षक म्हणून सेवेत आलेले फडतरे हे गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात सी-६० कमांडो पथकात रुजू झाले.
अतिदुर्गम जंगलात उल्लेखनीय कारवाया करून पदोन्नती मिळवली. २०१८ मध्ये कासन्सूर-झिरबोरिया जंगलात नक्षलविरोधी मोठ्या ऑपरेशनचे नेतृत्व त्यांनी केले, ज्याची दखल घेऊन हे पदक जाहीर झाले. यापूर्वी २०२१ च्या उत्कृष्ट कामगिरीसाठी २०२३ मध्ये पहिले शौर्य पदक मिळाले होते. सप्टेंबर २०२४ पासून चिखली पोलिस ठाण्यात गुन्हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या फडतरे यांना अंतरिक सेवा आणि खडतर सेवा पदकही लाभले आहेत.या पदकांनी पिंपरी-चिंचवड पोलिस दलाचा मान वाढवला असून, युवा पोलिसांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा
