पुणे- प्रतिनिधी
शहरात बंद दुकानं-घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना आंबेगाव पोलिसांनी “चितळे बंधू”च्या दुकान फोडणाऱ्या सराईत ओमकार मारूती देडे (२१, रा. धायरी)ला पकडलं. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून आंबेगाव (aambegav) आणि विमानतळ पोलिस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली.(Chitale bandhu)
गेल्या २५ जानेवारीला चितळे बंधूंच्या दुकानात घुसून चोरट्यांनी रोकड लुटली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात ओमकार आणि त्याच्या साथीदारांचा उल्लेख असल्याचं निदान झालं. शोध घेत असताना ओमकारला ताब्यात घेतलं. त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.(pune crime)
सखोल तपासात त्यांच्याकडून रिक्षा, रोकड, दुचाकींसह चोरलेला ऐवज जप्त झाला. ही यशस्वी कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, पीआई (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर,(psi mohan klamkar) अंमलदार शैलेंद्र साठे (constable sathe)व पथकाने केली.
