Pune : पुणे पोलिस भरतीमुळे पाषाण परिसरात वाहतूक निर्बंध

पुणे – प्रतिनिधी

राज्य पोलिस दलाच्या १५,३०० पदांसाठी मोठ्या भरती प्रक्रियेला पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, पाषाण  (Pashan road )येथे ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. हजारो उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी गर्दी वाढल्याने सुरक्षिततेसाठी अंतर्गत रस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ४ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.(police bharati)

प्रभावित मार्ग आणि पर्यायी रस्ते:पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पुरंदर हॉल, बाणेर रोडपर्यंत.पाषाण रोडवरील पेट्रोल पंप ते बाणेर रोडवरील पेट्रोल पंप.वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव (DCP himant jadhav) यांनी सांगितले, “उमेदवारांची गर्दीमुळे हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.” प्रशासनाने पुणे विद्यापीठ चौक मार्गे पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन केले आहे. आयटी पार्क, बाणेर-पाषाण आणि विद्यापीठ रस्ता भागात सकाळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त वेळ घेऊन प्रवास करा, असे सांगितले.भरती प्रक्रियेत शिस्त, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तैनात आहेत. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *